Anna Hech Purn Brahma !!

Anna Hech Purn Brahma !!

Saturday, 1 July 2017

मटार पुलाव Peas Pulav

राईस म्हणजे सर्वांचाच आवडीचा विषय..आणि त्यात पुलाव किंवा बिर्यानी म्हटलं की तोंडाला पाणीच सुटत..
मला मटार अजिबातच आवडत नाही पण माझ्या नवऱ्याला मटार म्हणजे दुसरं चिकन !
 म्हणून खास त्यांच्यासाठी आज मटार पुलाव चा बेत केला!
 तुम्ही सुद्धा ही रेसिपी try करा..नक्की आवडेल ☺️


साहित्य-

बासमती तांदूळ, मटार, कांदा, बटाटा, अक्खा गरम मसाला (तमालपत्र, लवंग, वेलची, जयफळाच फुल, खसखस, काळीमिरी,जिरं), हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या, आलं बारीक उभं चिरलेलं, लसूण उभी चिरलेली, साखर, मीठ ,धना पावडर


कृती- 
पुलाव हा मी तरी कूकर मध्ये करणच prefer करते.. गॅसची पण बचत आणि वेळेचीही!
तर प्रथम पॅन मध्ये तेल टाका.. तेल व्यवस्थित गरम होउदे मगच त्यात   पुढील साहित्य टाकण्यास सुरुवात करा कारण तेल व्यवस्थित गरम झालेले नसले की पदार्थाला कच्च्या तेलाचा एक वास येतो.
तेल गरम झाले की त्यात सर्व अक्खा मसाला एक एक करून टाका. तेलात गरम मसाला परतून झाला की त्या मध्ये उभा चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या add करा , साखर आणि मीठ चवीनुसार घाला.
त्यानंतर त्यात बटाटा आणि स्वच्छ धुतलेले मटार add करा. तेलात चांगले परतावा ..मग त्यात तांदूळ आणि त्याच्या प्रमाणात गरम पाणी  ओता. दोन शिट्ट्या घ्या .. कूकर चे झाकण उघडा वरून कोथिंबीर घालून मस्त गरमा गरम मटार पुलाव तुमच्या loved one ला serve करा..

No comments:

Post a Comment