संध्याकाळी उशिरा काही नाश्ता केला की मग जेवण कमीच जात..रात्रीच जेवण उरतं! मग प्रश्न असा की या जेवणाचं करायचं काय??
आणि सकाळी सर्वांना पडणारा नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे "आज नाश्ता काय बनवायचा ?"
पण हे दोन प्रश्न एकत्र पडले की त्याच उत्तर बनतं एक नवीन एक्सपरिमेंटल डिश!
अश्याच झटपट बनवता येणाऱ्या एका एक्सपरिमेंटल डिशची रेसिपी मी आज तुम्हाला सांगणार आहे!
डिशचे नाव - फोडणीची चपाती
साहित्य-
तयार चपाती चे बारीक तुकडे, राई किंवा कडीपत्ता, मीठ, हळद, तिखट मसाला , तेल किंवा बटर, साखर
कृती-
चपातीचे बारीक तुकड्यांमध्ये मीठ, मसाला, साखर आणि हळद घालून ते मिक्स करून घ्या मग एका पॅन मध्ये एक चमचा तेल किंवा बटर टाका त्यात राई किंवा कडीपत्त्याची फोडणी द्या आणि मग ते हळद मीठ मसाला साखर लावलेले चपतीचे तुकडे त्यात घाला. थोडे परतवा आणि गरम गरम कुरकुरीत फोडणीची चपाती serve करा !